
Panjab dakh live ; पंजाबराव डख म्हणतात राज्यातील या भागात गारपिट होणार…
Panjab dakh live ; राज्यातील थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 25 डिसेंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार डख यांनी 30 डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दि. 26/डिसेंबर पासून अवकाळी पावसाचा अंदाज असून 29/ डिसेंबर पर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडेल तसेच अमरावती जिल्ह्यात 27/, 28/ डिसेंबर दरम्यान काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. डख यांनी सांगितले कि बीड, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यात जास्त पावसाचा अंदाज आहे.
दि. 27/,28/ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट तसेच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27/ डिसेंबर पासून नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर तसेच मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावेल.
दि. 27/ डिसेंबर दरम्यान बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.
28/डिसेंबर रोजी यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.