Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं? स्वस्त आणि महाग वस्तूंची यादी पाहा..

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ सादर झाला असून विविध वस्तूंवरील सीमाशुल्क (Custom Duty) आणि करांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काहींवर अतिरिक्त कर लागल्याने त्या महाग होणार आहेत.

यामध्ये कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग असणार आहेत. यावर एक नजर टाकुयात….

स्वस्त होणाऱ्या वस्तू :


इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी: लिथियम आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या ३५ प्रकारच्या भांडवली वस्तूंवरील कर हटवला.

मोबाईल फोन बॅटरी उत्पादनः मोबाईल फोनसाठी लागणाऱ्या २८ घटकांवरील कर हटवण्यात आला.

तांदूळ आणि डाळीः काही डाळी आणि अन्नधान्यांवरील शुल्क कमी करून अन्नसुरक्षेला मदत.

चिकटवणारे पदार्थ (Binders) आणि काही रसायनेः औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या रसायनांवरील कर कपात.

पवन आणि सौर ऊर्जा उपकरणेः सौर पॅनेल आणि पवन टर्बाइनसाठी लागणाऱ्या उपकरणांवरील शुल्क माफ.

टेक्सटाईल उद्योगः नवीन प्रकारच्या कापड यंत्रांसाठी सीमाशुल्क माफी.

मेडिकल उपकरणेः काही जीवनावश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील शुल्क कमी.

अन्न प्रक्रिया उद्योगः खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही यंत्रसामग्री स्वस्त.

मरीन उद्योगः मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या काही उपकरणांवरील कर कपात.

महाग होणाऱ्या वस्तू

इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनल (IFPD): १०% वरून २०% सीमाशुल्क वाढवले.

दुचाकी आणि मोटारसायकली (CBU): १६०० सीसीच्या खालील इंजिन असलेल्या मोटरसायकलींसाठी कर ५०% वरून ४०% केला.

कापड आणि विणकाम वस्त्रेः काही प्रकारच्या विणलेल्या कापडांवरील कर वाढवून “२०% किंवा ११५ रुपये प्रति किलो” असा नवा दर लागू.

विद्युत उपकरणेः काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील आयातीवरील कर वाढवला.

प्लॅटिनम आणि महागडी धातूः काही मौल्यवान धातूंवरील शुल्क वाढवले.

किंमती कपडे आणि फर्निचरः उच्च ब्रँडेड कपडे आणि काही लाकडी फर्निचर महागणार.

आंतरराष्ट्रीय प्रवासः विमानतळ वापर शुल्क आणि इंधन दरवाढीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास महागण्याची शक्यता.

Sharing Is Caring:

Leave a Comment