
Reserve bank / रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना दिलासा देत कर्ज मर्यादेत 40 हजाराची वाढ करत 02/लाख एवढी मर्यादा केली आहे. रिझर्व्ह बँकेने 2019 नंतर प्रथमच बदल केले आहे. RBI ने पत धोरण समितीच्या बैठकीत शुक्रवारी दि. 06/12/2024 रोजी कर्ज मर्यादा वाढीचा निर्णय घेतलाय.
आरबीआयने रेपो दर 6.5% ठेवला असुन कर्ज व्याज दरात कपात लांबणीवर पडली आहे. परंतु रोख राखीव (CRC) 4.5 % वरुण वरुन 4% एवढा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बॅंकांना अतीरिक्त 1.16 लाख कोटी रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे.
आरबीआयच्या या निर्णयामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार असून कृषी कर्ज मर्यादेत 40 हजाराची वाढ केली असल्याने आता विना तारण 2 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. शेतीकामासाठी वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांना वाढीव कर्जाची आवश्यकता असते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेने वाढती महागाई आणि शेतीसाठी लागणाऱ्या शेत उपयोगी वस्तुच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता विना तारण शेतीकर्जाची मर्यादा एक लाख 60 हजारांवरुन 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता काहीही तारण नसताना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
