
Property update online आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षित आर्थिक भविष्या साठी किंवा आपले वार्धक्य सुरक्षित आणि बेफीकरीचे जावे यासाठी ‘नवीन प्रॉपर्टी’ घेणे हे आपले स्वप्न असते किंवा ‘जुनी प्रॉपर्टी’ विकून पैशांची गुंतवणूक पुढील उदरनिर्वाहा साठी अनेक जण करुन ठेवतात. परंतु आपल्याच हक्काच्या प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर जर कुणी विरोध दर्शवित त्यावर नोटीस बजावली तर? एक मिनिटा साठी का होईना चिंता दाटली ना मनात? चला तर मग जाणून घेऊया की, या नोटीस पासून वाचायचे असेल तर आपल्याला कोण-कोणत्या शासकीय अटी-नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. Income tax department
घाबरु नका ! आयटी रिटर्न्स फाईल करा आणि निश्चिंत रहा !
आयटी रिटर्न्स फाईल करताना मात्र तुमच्या खरेदी, विक्रीची, गुंतवणुकी ची संपूर्ण माहिती आयकर खात्याकडे जमा करा. कोणती ही गोष्ट छुपी न ठेवता सर्व मोठ्या व्यवहारांची माहिती आयकर खात्याकडे द्या आणि त्यावर कर सवलत मिळवा. तुमची माहिती जमा करताना कोणत्याही नियमांचे उल्लघंन होणार नाही याची सर्व-तोपरी काळजी घ्या.
काही लाखांची मर्यादा लक्षात ठेवा –
- ३० लाख – मोठ्या कोणत्याही माल-मत्तेची खरेदी – विक्रीची मर्यादा ३० लाखांपर्यत आहे हे लक्षात ठेवा.
- १० लाख – तुमच्या कडे परकीय चलन असल्यास ते विकताना किंवा खरेदी करताना १० लाखांची मर्यादा लक्षात ठेवा अन्यथा, या दोन्ही व्यवहारां सदर्भात आयकर खाते तुम्हांला नोटीस बजावू शकेल. तसेच या नोटीसला उत्तर देताना मात्र तुम्हांला घाम फुटेल ! त्यामुळे पुढील काही गोष्टींची काळजी घ्या, Property update
तुमचे बचत आणि चालू खाते
१० लाख रुपयां पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात केले असतील तर त्याची माहिती निमुट-पणे आयकर खात्या कडे सुपूर्द करा. तसेच या आर्थिक वर्षात ५० लाखल रुपयां पेक्षा जास्त गुंतवणूक झाली असेल तर त्याचीही माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल.
एफ.डी. व मुदत ठेव
तुमच्या खात्यात १० रुपयां पेक्षा रोख रक्कम असल्यास किंवा एफ.डी. FD खात्यात जमा असल्यास त्या संदर्भात बँका कडून 61A फॉर्म भरणे गरजेचे आहे. त्याची माहिती आयकर विभागाला देणे गरजेचे आहे.
तुमचे क्रेडीट कार्ड बील
तुमच्या उधारीच्या खरेदी वर देखील आयकर विभागाची नजर असते. १ लाख रुपयां पेक्षा जास्तीचे क्रेडीट कार्डचे बील रोख रकमेने भरल्यास तातडीने ती माहीती आयकर खात्याला द्यावी लागेल. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. Property update
शेअर्स व बॉड्स
शेअर्स, म्युअचल फंड, बाँड्स यातील १० लाख रुपयां पेक्षा जास्तीची गुंतवणूक तुम्हांला महागात पडू शकते. तुमच्या सर्व व्यवहारां वर आयकर खात्याचे लक्ष असते. त्यामुळे तुमच्या प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा, आयकर विभागा कडे आर्थिक व्यवहारांची माहिती जमा करा व निश्चिंत रहा.
आयकर विभागाचे महत्त्व
भारत सरकारच्या अखत्यारीत असलेले आयकर विभाग हे कोणत्याही नागरिकाला विनाकारण त्रास देण्या साठी स्थापन करण्यात आलेले नाही याची खात्री बाळगा. अनेकदा नागरिक कर वाचवण्या साठी चुकीच्या मार्गाचे अवलंबन करतात. कर हे देशाचा कारभार सुरळीत चालावा, चलनाची किंमत वाढावी यासाठी ठरविण्यात आलेले असतात. कर भरणे ही एक प्रकारची देशसेवाच असते. आणि अनेकजण कर भरण्या-साठीच पळवाटा शोधतात तेव्हा मात्र आयकर विभागाला त्यांच्यावर करडी नजर ठेवावी लागते. तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा गैरव्यावहार किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नसतील आणि उगीचच कॅश स्वरूपात पैसे जमवून ठेवले नसतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण वर्षातून एकदा शासनाने जाहीर केलेल्या तारखेस तुम्ही तुमची कमाई, खर्च या संदर्भातील फाईल म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न फाईल आयकर विभागात सबमीट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करण्याची गरज भासणार नाही. Property update