
Pik Vima Nukasan 2024 विदर्भा सह मराठवाड्या मध्ये पावसाने हजारो हेक्टर शेती पाण्या-खाली गेली आहे. त्या मुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून जन-जीवन विस्कळीत झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमा तून खरीप हंगाम 2024- 25 मधील विमा धारक शेतकऱ्यांचे पावसामुळे शेता मध्ये पाणी साचून नुकसान झाले असले तर 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे. या साठी काय करायचे ? विमा कंपनीला कशी तक्रार करायची ? ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? शेतकऱ्यांचे पावसा मुळे नुकसान झाल्या नंतर 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचे विमा कंपन्यांना सांगणे आवश्यक आहे. या साठी ऑन-लाईन तक्रार कशी करावी ? त्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Pik Vima
Pik Vima Nukasan 2024 विमा कंपनीला तक्रार कशी करावी ?
- सर्व प्रथम आपल्याला प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊन–लोड करायचे आहे
- या नंतर कंटिन्यूअस गेस्ट हा पर्याय निवडा
- या मध्ये पीक नुकसान हा पर्याय निवडा, आयडी मिळेल या वर तुम्हाला विमा मिळतो त्या मुळे हा नंबर जपून ठेवावा
- या मध्ये पीक नुकसानाची पूर्व सूचना या पर्याया वर क्लिक करायचे आहे
- तुमचा मोबाईल नंबर टाकावा या नंतर तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वरती ओ.टी.पी. येईल तो ओ.टी.पी. तिथे टाकावा
- पुढील टप्प्यां मध्ये हंगाम खरीप वर्ष 2024 योजना आणि राज्य निवडा
- नोंदणीचा स्त्रोत सीएससी निवडा, या मध्ये पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका
- ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून तक्रार करावी
- कशा मुळे नुकसान झाले ? याचा तपशील भरा पिकांचा फोटो काढून सबमिट करावा
या नंतर तक्रार यशस्वी रित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा आयडी मिळाली यावर तुम्हाला पिक विमा मिळतो त्यामुळे हा नंबर जपून ठेवावा. Pik Vima Nukasan 2024
प्रधानमंत्री पिक विमा वेबसाईट वरून करता येईल तक्रार Pik Vima Nukasan
Pik Vima Nukasan 2024 पिक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळा वरून तुम्हाला पीक विम्याच्या नुकसान ची तक्रार करावी लागेल, यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळा वर चा यानंतर त्या वर ते रिपोर्ट क्रॉप लॉस वर क्लिक करून इन्शुरन्स कंपनी मध्ये तुमच्या पिकांचा विमा काढला आहे, ती कंपनी निवडून त्या मध्ये आपले सर्व तपशील भरा या नंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्या नंतर मिळणारा नंबर सेव करा. Pik Vima