MPSC Krushi Seva Bharti 2024: पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी.. 0258 रिक्त पदांसाठी लगेचच करा अर्ज..

MPSC Krushi Seva Bharti 2024
MPSC Krushi Seva Bharti 2024

MPSC Krushi Seva Bharti 2024: शासकीय नोकरी मिळवणं ही अनेकांच्या स्वप्नांमधील एक महत्वाची गोष्ट असते. आणि मित्रांनो आता तुम्ही तुमच हेच स्वप्न वास्तवात साकारू शकणार आहात. कारण सरकारी नोकरी मिळवण्याची एक अनमोल संधी महाराष्ट्र कृषी सेवा विभागात उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून कृषी सेवा विभागात एकूण 0258 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून या भरतीत सहभागी होऊन तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची ही एक उत्तम अशी वेळ आहे.

शासनाच्या कृषी सेवा विभागातील ही भरती प्रक्रिया म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचीच संधी नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शेतकरी समुदायासाठी काम करण्याची देखील एक उत्कृष्ट अशी संधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवण्यासाठी आणि राज्यातील कृषी क्षेत्राला उन्नत करण्यासाठी जर तुम्हाला तुमचे योगदान द्यायचे असेल, तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे.

भरतीची महत्त्वाची माहिती | MPSC Krushi Seva Bharti 2024 Recruitment Details

  • भरती विभाग: ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि कृषी सेवा विभागाच्या माध्यमातून केली जात आहे.
  • पदाचा प्रकार: राज्य शासनाच्या कृषी सेवा विभागात ही सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

पदाचे नाव | MPSC Krushi Seva Bharti 2024 Post Name

या भरतीत उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी – कनिष्ठ, तसेच इतर विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. ही पदे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला दिशा देणारी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करणारी आणि सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारी आहेत.

पदांची संख्या | Total Number of Post’s

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 0258 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी यासारखी विविध पदे समाविष्ट आहेत, ज्यामुळे तुमच्यासाठी विविध पदांच्या संधी उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कृषि, कृषि अभियांत्रिकी, उद्यानविद्या किंवा संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही या पात्रता निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात. तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वयोमर्यादा | Age Limit

45 वर्षांपेक्षा जास्त वय उमेदवाराचे नसावे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

वेतन श्रेणी

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन ₹21,000 ते ₹41,000 इतके दिले जाणार आहे.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

या भरती अंतर्गत शासकीय सेवेमध्ये काम करताना मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक असणार आहे.

अर्ज पद्धत | Application Mode

सर्व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. अर्ज करताना उमेदवारांनी आपली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करावीत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. जे उमेदवार या संधीचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी विलंब न करता अर्ज प्रक्रियेला सुरुवात करणे आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख | Last Date to Apply

17 ऑक्टोबर 2024 ही अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी खूपच कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करणे अतिशय आवश्यक ठरणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करावा? | How to apply for MPSC Krushi Seva Bharti 2024

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपातच आहे. अर्ज करताना आपली सर्व माहिती अचूक भरावी. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अर्ज सादर करण्यास विलंब न करता लगेचच अर्ज करा, कारण अंतिम तारखेनंतर अर्ज सादर करणे शक्य होणार नाही.

मुख्य आणि पूर्व परीक्षा

या भरती प्रक्रियेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे असतील. पूर्व परीक्षेतील निकालावर आधारित उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जाईल. मुख्य परीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्रपणे जाहीर केले जातील. त्यामुळे, सर्व तयारी योग्य प्रकारे करून या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात

https://drive.google.com/file/d/1El7xjNZOOCdmtGsK3H-Mf8WD_Rcb4eu8/view?usp=drivesdk

ऑनलाईन अर्ज- https://mpsc.gov.in/home

Sharing Is Caring:

Leave a Comment