Land Area Calculator App Download: मोबाईलमधून करा जमिनीची अचूक मोजणी, कोणताही खर्च न करता!

Published on: 25-10-2025

Land Area Calculator App Download: आजच्या काळात जमिनीशी संबंधित वाद, गैरसमज आणि वाटप यामध्ये त्या जमिनीची करण्यात येणारी अचूक मोजणी ही अत्यंत गरजेची बाब ठरत आहे. अनेक वेळा शेतीची जमीन असो वा बिगरशेती जमीन, पण ती जमीन कोणाच्या मालकीची किती आहे, यावरून भरपूर वाद निर्माण होतात. या वादातून मार्ग काढण्यासाठी जमीन मोजणी आवश्यक असते, पण पारंपरिक पद्धतीने मोजणी करताना वेळ लागतो, खर्च येतो आणि सरकारी प्रक्रियेमुळे कधी कधी काम अधिकच गुंतागुंतीचं होतं.

मात्र आता काळ बदललाय. तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही घरबसल्या, कोणत्याही खर्चाशिवाय तुमची जमीन अचूकपणे मोजू शकता. यासाठी तुम्हाला लागेल फक्त एक मोबाईल फोन आणि एक अ‍ॅप, ज्याचं नाव आहे GPS Area Calculator. चला तर मग जाणून घेऊया या अ‍ॅपच्या मदतीने जमीन मोजणी कशी करायची.

मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने जमीन मोजणी कशी कराल?

तुम्हाला जमिनीची मोजणी करायची असल्यास, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:

  • सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील Play Store उघडा.
  • त्यानंतर त्यावर Google Map Calculator असे टाईप करा.
  • तुम्हाला अनेक अ‍ॅप्स दिसतील, त्यापैकी GPS Area Calculator हे अ‍ॅप निवडून तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
  • अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमधील GPS ऑन करा.
  • आता GPS Area Calculator हे अ‍ॅप उघडा.
  • तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण नकाशा दिसेल. त्यात तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि नेमकं ठिकाण टाका.
  • जमिनीचा नकाशा समोर आल्यानंतर जमिनीच्या चारही कोपऱ्यांवर क्लिक करून ती सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला मोजणीसाठी Square Feet, Square Meter, Acre, Hectare यासारखी परिमाण निवडण्याचा पर्याय मिळेल.
  • हे सिलेक्शन पूर्ण झाल्यानंतर अ‍ॅप तुमच्या जमिनीचं अचूक क्षेत्रफळ दाखवेल.

GPS Area Calculator App म्हणजे नेमकं काय?

एक अत्यंत उपयुक्त ॲप म्हणून GPS Area Calculator हे ओळखलं जात आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ हेक्टर, एकर, गुंठा, चौ. फूट, चौ. मीटर अशा विविध मोजमापांमध्ये सहजपणे बघू शकता. या अ‍ॅपमुळे जमीन मोजण्यासाठी तुम्हाला कुठेही फिरावं लागत नाही. ॲप मधील नकाशावर क्लिक करून तुम्ही कोणतीही जमीन अगदी अचूकपणे मोजू शकता.

भारतात अशा अ‍ॅप्सची गरज का भासते?

भारत हा कृषिप्रधान देश असल्याचं आपल्याला माहितच आहे आणि इथं लाखो शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. विशेषतः एका गावात एकाच कुटुंबाच्या विविध सदस्यांच्या जमिनी एकत्र असतात, तिथं मालकी हक्कावरून अनेक वेळा वाद निर्माण होतात. शासकीय पद्धतीने मोजणी करताना सरकारी खर्च, फॉर्म, नोंदणी यामध्ये वेळ जातो. याच्या तुलनेत मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्या काही मिनिटांत जमीन मोजता येते, आणि तेही अगदी मोफत.

जमिनीच्या मोजणीसाठी आवश्यक परिमाणांची माहिती

  • 1 गुंठा = 1089 चौरस फूट (33×33 फूट)
  • 1 एकर = 40 गुंठे = 43560 चौरस फूट
  • 1 हेक्टर = 2.47 एकर = 107636 चौरस फूट

वरील परिमाणांमधून आपल्याला सहजपणे कोणतीही जमीन एका मापनातून दुसऱ्या मापनात रूपांतरित करता येते.

जमिनीचं क्षेत्रफळ मोजण्याचं सुत्र समजून घ्या

  • सर्वप्रथम जमिनीची लांबी आणि रुंदी मोजा, जर ती चौरस किंवा आयत असेल.
  • जर बाजू वेगवेगळ्या असतील, तर समोरासमोरच्या बाजूंची बेरीज करून दोनने भागा, आणि यामध्ये मिळालेली लांबी आणि रुंदी वापरा.
  • नंतर लांबी x रुंदी करून चौरस फूट क्षेत्रफळ काढा. आलेलं उत्तर 1089 ने भागलं की तुम्हाला गुंठे मिळतील.
  • गुंठ्यांमध्ये मिळालेल्या उत्तराला 40 ने भागलं, तर ते एकरात रूपांतरित होईल, आणि याचप्रमाणे एकर x 2.47 केल्यास हेक्टर मिळेल.
  • जर जमीन त्रिकोणाकृती असेल, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ मोजण्याचं विशिष्ट सुत्र वापरावं लागेल.

AapliBoli: आम्ही मराठीत दररोज हवामान अंदाज, सोयाबीन बाजारभाव, शेतीविषयक मार्गदर्शन, तसेच सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्स देतो. आमचं उद्दिष्ट आहे – शेतकरी आणि नागरिकांना अचूक, सोपी आणि वेळेवर माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणं. “AapliBoli” च्या माध्यमातून आम्ही ग्रामीण महाराष्ट्राला डिजिटल माहितीच्या माध्यमातून जोडण्याचं कार्य करतो.🚀

Follow Us On Social Media

Get Latest Update On Social Media