
मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण 10 वी पास असेल तर काळजी करु नका. भारतीय टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदासाठी 44228 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा घ्यावा आणि शासकीय नोकरीची संधी मिळवावी. Indian Postal Department Bharti 2024
शैक्षणिक पात्रता
नोकरीसाठी इच्छूक उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीसाठी वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण ते 36 वर्षे इतकी असून. ओबीसी, जाती जमातींमधील आरक्षीत प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येते. ही सवलत म्हणजे उमेदवार 40 वर्षां असल्यासही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. Indian Postal Department Bharti 2024
परीक्षा शुल्क किती असेल
जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी 100 रुपये भरणे आवश्यक आहे.
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी कारण्यात येणार नाही.
नोकरीत निवड झाल्यानंतर पगार किती असेल?
भारतीय टपाल विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून निवड झाल्यानंतर 10,000/- ते 29,380/- इतका मासिक पगार असणार आहे, तसेच शासकीय नोकरीमधील इतर भत्ते देखील मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
भारतीय टपाल विभाग भारतातील संपूर्ण राज्यांमध्ये कार्यरत असल्याने निवड झाल्यानंतर भारतभर कोणत्याही राज्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. Indian Postal Department Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा.
निवड प्रक्रिया कशी असेल?
भारतीय टपाल विभागांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी पुढील निवड प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे.
- लेखी परीक्षा – सुरुवातील अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल त्यातून गुणवत्ता यादीत आलल्या उमेदवारांची निवड केली जाईल.
- दस्तऐवज पडताळणी – निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर योग्य कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच नोकरी देण्यात येणार आहे. Indian Postal Department Bharti 2024
येथे अर्ज करा
hhttps://indiapostgdsonline.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. राज्य निवडल्यानंतर तुमच्या राज्यांतर्गत दिलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. Indian Postal Department Bharti 2024
येथे जाहिरात पहा
https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबंधीत भरतीची जाहीरत पाहू शकता. आणि अधिक माहिती मिळवू शकता. Indian Postal Department Bharti 2024
भारतीय टपाल विभागासंदर्भात अधिक माहिती
कोणत्याही शासकीय विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीसाठी अर्ज करताना अर्जदार उमेदवारांना त्या त्या शासकीय खात्याबद्दल अधिक माहिती असणे गरजेचे असते.
भारतीय डाक विभागाची 1764 मध्ये स्थापना झाली. भारतभर टपाल सेवा पुरविण्याचे या विभागाचे काम होते. आज भारतात टपाल सेवेची व्याप्ती खूप मोठी आहे. या टपाल विभागामार्फतच प्रत्येक राज्याला आणि राज्यातील प्रत्येक तालुक्याला पीन कोड देण्यात आला आहे. या पीन कोडच्या माध्यमातून टपाल सेवा काम करीत असते. Indian Postal Department Bharti 2024