
HSC Exam Admit Card 2025: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) 2025 परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.

मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉 लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Download Now Link
विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉलतिकीट/प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
MSBSHSE Maharashtra Board Admit Card
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रवेशपत्रात विषय, माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या दुरुस्त्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.
प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचे नाव, छायाचित्र, स्वाक्षरी या बाबतच्या दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा-महाविद्यालयांनी पुन्हा प्रवेशपत्राची प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3HCbWS8
हे देखील वाचा
