How to Check E Challan Status: या सोप्या पद्धतीने तपासा तुमच्या गाडीवर लागलेला दंड, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Published on: 25-10-2025

How to Check E Challan Status: आपण जेव्हा रस्त्यावर वाहन चालवतो, तेव्हा वाहतुकीचे नियम पाळणं हे फक्त कायदेशीरच नव्हे तर सुरक्षिततेसाठीही अत्यावश्यक असतं. पण अनेकदा आपल्याकडून अनावधानाने एखादा नियम मोडला जातो, आणि आपल्याला त्यासाठी दंडही भरावा लागतो. काही वेळा तर आपल्याला कळतही नाही की आपल्यावर दंड आकारलेला आहे, कारण आता चलान ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाली आहे.

म्हणूनच हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या वाहनावर कुठलाही दंड लागलेला तर नाही ना? कारण वेळेत हा दंड भरला नाही, तर तुम्हाला थेट कोर्टात जावं लागू शकतं, आणि ते टाळणं नक्कीच महत्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया की घरबसल्या आपण हे ई-चलान कसं तपासू शकतो आणि गरज असल्यास ते कसं भरू शकतो याबद्दल.

ई-चलान म्हणजे काय आणि ते कसं आकारलं जातं?

सध्याच्या डिजिटल युगात वाहतूक पोलिसांकडे आधुनिक कॅमेरे आणि ट्रॅकिंग सिस्टीम्स आहेत, त्यामुळे जरी रस्त्यावर पोलीस उपस्थित नसले तरी वाहतुकीचा नियम मोडल्यास तुमच्या गाडीचा फोटो काढून, गाडीचा नंबर स्कॅन करून, तुमच्या नावावर ई-चलान नोंदवले जाते. उदाहरणार्थ, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये गाडी लावणे, सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे यांसारख्या गोष्टींसाठी चलान लागतं. आण याचे मेसेज तुमच्या मोबाईलवर देखील येतात, पण बऱ्याच वेळा ते नजरेआड होतात, म्हणूनच याबद्दल खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे.

ई-चलान स्टेटस ऑनलाइन कसे तपासावे?

ई-चलान तपासण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता,

  • यासाठी सर्वप्रथम वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा गुगल प्ले स्टोअरवरून ‘MahaTraffic’ हे ॲप डाउनलोड करा.
  • हे ॲप ओपन केल्यानंतर ‘Online Services’ किंवा ‘चेक चलान स्टेटस’ हा ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर आता तुमचा वाहन क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक त्या ठिकाणी टाका.
  • पुढे माहिती भरल्यानंतर ‘Get Details’ या बटणावर क्लिक करा.
  • जर तुमच्या नावे कोणतंही चलान आलेलं नसेल तर ‘No Pending Challan’ असा मेसेज तुम्हाला दिसेल.
  • पण जर तुम्हाला चलान आलेलं असेल, तर त्याची संपूर्ण माहिती, रक्कम, आणि कोणत्या कारणामुळे चलान लागला आहे हे सर्व स्पष्टपणे बघायला मिळेल.
  • तुम्हाला ते चलान तिथूनच ऑनलाईन भरता येते. त्यासाठी तुम्हाला ‘Pay Now’ या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • पेमेंटसाठी नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांचा वापर तुम्ही करू शकता.
  • पेमेंट झाल्यानंतर त्याची रिसिट कॉपी जवळ ठेवा.

ही माहिती का महत्त्वाची आहे?

जर तुम्ही वेळेवर दंड भरला नाही, तर तुमच्या नावे कोर्टात केस जाऊ शकते. त्यानंतर कोर्टात हजेरी लावावी लागते आणि दंडाची रक्कमही वाढते. यासोबतच तुम्हाला वाहन नोंदणी नूतनीकरण, विमा, किंवा इतर शासकीय प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. म्हणूनच जर तुम्ही चुकून किंवा कसाही नियम मोडला असेल तर त्याची माहिती वेळेवर मिळवा आणि त्यावर त्वरित कारवाई करा.

AapliBoli: आम्ही मराठीत दररोज हवामान अंदाज, सोयाबीन बाजारभाव, शेतीविषयक मार्गदर्शन, तसेच सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्स देतो. आमचं उद्दिष्ट आहे – शेतकरी आणि नागरिकांना अचूक, सोपी आणि वेळेवर माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणं. “AapliBoli” च्या माध्यमातून आम्ही ग्रामीण महाराष्ट्राला डिजिटल माहितीच्या माध्यमातून जोडण्याचं कार्य करतो.🚀

Follow Us On Social Media

Get Latest Update On Social Media