Gharkul Yojana List 2024: गावानुसार घरकुल लाभार्थी PDF याद्या आल्या..!! असे करा नाव चेक…..

Gharkul Yojana List 2024: मित्रांनो नमस्कार, देश भरात नागरिकांना स्वतःच्या हक्का चे पक्के घर मिळावे या साठी आपल्या केंद्र सरकार ने देश भरात घरकुल योजना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णया नंतर आता पर्यंत लाखो नागरिकां ना या योजने अंतर्गत लाभ मिळाला असून. अनेकांनी स्वतःच्या हक्का ची पक्के घर बनवले आहेत. त्याच बरोबर आता पुन्हा एकदा या योजने ची लाभार्थी यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील अगदी सहजरित्या पाहू शकता. घरकुल लाभार्थी यादी मोबाईल वर कशी पहायची या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत. त्या मुळे तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

पंतप्रधान घरकुल आवास योजने ची नवीन यादी नक्कीच जाहीर झाली आहे. या यादीत गाव खेड्यातील नावे आली आहेत. यामुळे या यादीत नागरिकांचे नाव आहे त्यांना स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सरकारकडून तब्बल दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थी यादीत नाव तपासणी खूप गरजेचे आहे. सहा महिन्यांपूर्वी किंवा एक वर्षांपूर्वी अर्ज केला होता अशा नागरिकांचे या लाभार्थी यादीत नाव असणार आहेत. तसेच तुम्ही देखील तुमचे या यादीत नाव पाहू शकता.

पंतप्रधान घरकुल लाभार्थी यादीत नाव कसे पहावे?
पंतप्रधान घरकुल लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..


https://rhreporting.nic.in/netiay/SECCReport/report_categorywiseseccverification.aspx
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाल
त्यानंतर त्या ठिकाणी ऑल स्टेटस या ठिकाणी राज्य निवडा
त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा
त्यानंतर तालुका निवडा
त्यानंतर तुम्ही ज्या गावां मध्ये राहत आहात त्या गावाचे नाव निवडा
वरील माहिती व्यवस्थित भरल्यानंतर द अन्सर (The Answer) या पर्यायावर क्लिक करा.
मित्रांनो यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थी यादी पाहायला मिळेल. तुमचे नाव असेल तर तुम्हाला सरकारकडून लवकरच घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.Gharkul Yojana List 2024

पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा

करायचा?

पंतप्रधान घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://pmaymis.gov.in/
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाल
तर त्या ठिकाणी नागरिकांचे मूल्यांकन या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनू मधून अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला चार पर्याय दिसतील, जो पर्याय लागू होईल तो पर्याय निवडा
त्यानंतरची माहिती तुम्ही व्यवस्थित भरा…
आणि तुमचा अर्ज सबमिट करा


पंतप्रधान घरकुल योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
अर्जदाराचा मोबाईल नंबर
अर्जदाराचा निवासी पत्ता
अर्जदाराचे दोन फोटो
बँक पासबुक झेरॉक्स
आवश्यक असल्यास ईमेल आयडी देखील लागू शकतो.Gharkul Yojana List 2024

Sharing Is Caring:

Leave a Comment