Dhamori : धामोरीच्या अडबंगीनाथ पायी दिंडीचे अहिल्यानगरात उत्स्फूर्त स्वागत

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र धामोरी येथून पंढरपूरला विठूरायाच्या भेटीला निघालेल्या अधिष्ठाण अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगरमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पायी दिंडी सोहळ्याचे हे ३० वे वर्ष आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र धामोरी ते पंढरपूर अधिष्ठाण अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याहीवर्षी २९ जून रोजी या पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पायी दिंडीचे टाळ-मृदुंगाच्या गजरात अहिल्यानगरमध्ये आगमन होताच धामोरीच्या माहेरवाशीण असलेल्या सौ. सोनम गाडळकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या भक्तिभावाने पायी दिंडीचे स्वागत करण्यात येवून वीणा पूजन करण्यात आले.यावेळी पार पडलेल्या कीर्तन सेवेत ह.भ.प.हेमाडे महाराजांनी पायी वारीचे महत्व विषद केले.

यावेळी अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख ज्ञानदेव मांजरे यांचा गाडळकर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना भोजन देण्यात येवून ज्ञानदेव मांजरे यांच्या वतीने वारकऱ्यांना पिशव्यांचे वाटप करण्यात आले. अहिल्यानगरच्या भाविकांचे स्वागत व आदरतिथ्य स्वीकारत विठू नामाचा जयघोष करीत दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी या प्रसंगी ह.भ.प.ज्ञानेश्वर सोनवणे, काशिनाथ काळोखे, भास्करराव मांज,रे प्रकाश वाघ, बाळासाहेब भाकरे, बाळासाहेब पगार, राजेंद्र बारे, कारभारी माळोदे, रावसाहेब जगताप, पोपटराव जेजुरकर, महिला कीर्तनकार ह.भ.प.छायाताई महाराज लाड, नारायणराव लव्हाटे, प्रल्हाद रोहलेकर, भजनी मंडळ,नांदगाव भजनी मंडळ, प्रवरानगर भजनी मंडळ, कोपरगाव भजनी मंडळ, सांगवी भुसार, मायगाव देवी, शहाजापूर, कोळपेवाडी तसेच परिसरातील जेष्ठ श्रेष्ठ वारकरी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment