
Compliant direct to PM Modi online अनेकदा आपण ऐकतो की सरकारी काम आणि सहा महिने थांब! या वाक्याला साजेशी आपली संपुर्ण शासकीय व्यवस्था आहे, असे अनेकांचे कित्येक अनुभव आहेत. शासकीय कार्यालयात एखाद्या कामा साठी गेले असता सर्व-सामान्यांना कित्येक महिने थांबावे लागते. अनेक वेळेस यात शासकीय कर्मचाऱ्यांचा आर्थिक हेतू देखील असू शकतो. तर कधी कधी विनाकारण अडवणूक केली जाते. केंद्रीय विभागाने या वर एक उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे, आता तुमचे सरकारीक कार्यालया तील काम अडले असेल तर सर्व सामान्य जनता त्या बद्दल पंतप्रधान कार्यालया कडे तक्रार करु शकणार आहेत. चला मग जाणून घेऊया नक्की ही तक्रार करायची तरी कशी.
अशी करा ऑन-लाईन तक्रार

- सर्वप्रथम पंतप्रधान कार्यालयाची अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा https://www.pmindia.gov.in/en या लिंक वर क्लिक करुन देखील तुम्ही पंतप्रधान कार्याल याच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता.
- वेबसाईट च्या मुख्य पानावर Drop down menu दिसेल तिथे Interact with PM मधील Write to the Prime Minister या पर्याया वर क्लिक करा
- येथून पंतप्रधान कार्यालया कडे तक्रार ऑन-लाईन पाठवू शकता
- आता तुमच्या समोर एक CPGRAMS पेज ओपन होईल
- या पेजवर तक्रारी दाखल करता येतात
- तक्रार नोंदवल्या नंतर नोंदणी क्रमांक मिळेल
- तक्रारीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा
- विचारलेली सर्व माहिती भरा
- तुमची तक्रार नोंदवली जाईल Compliant direct to PM Modi
अशी करा पत्राद्वारे तक्रार

अजून ही असे नागरिक आहे ज्यांना संगणक किंवा स्मार्ट फोन बद्दल अधिक माहिती नाही. ऑन-लाईन पोर्टल केंद्र सरकार कडून सुरु करण्यात आला असला तरी ज्यांना ऑन-लाईन कामे करता येत नाहीत त्यांना अडचण येऊन नये या साठी पंतप्रधान कार्यालया मार्फत फॅक्स क्रमांक आणि कार्यालया चा पत्ता देखील जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयात नागरिक पत्र पाठवून तक्रार करु शकतात तसेच फॅक्स नंबर वर लिखीत तक्रार लिहून फॅक्स देखील पाठवू शकतील. Compliant direct to PM Modi
- पंतप्रधान कार्यालय पत्ता – प्रधान मंत्री कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन क्र.– 110011,
- FAX No. 011-23016857 या फॅक्स क्रमांकावर लिखीत तक्रार नागरिक पाठवू शकतात.
पंतप्रधान कार्यालयाकडून अशी होईल कारवाई Compliant direct to PM Modi online
पंतप्रधान कार्यालया तील नेमून दिलेले अधिकारी दररोज तक्रारींचे निवारण करीत असतात. Centralized Public Grievance Redress and Monitoring System नावाने शासकीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. माध्यमा तूनही तक्रारींचे निवारण करता येते. प्रशासनिक सुधार आणि जन तक्रार विभाग असे या विभागाचे नाव आहे. या पोर्टल च्या माध्यमा तून देशातील सर्व राज्यांकडून येणाऱ्या तक्रारींचे विभाग वार विभागणी केली जाते. त्यानंतर तक्रारी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची माहिती मिळवली जाते. जन सामान्यांकडून आलेल्या तक्रारीसंबंधीत अधिकाऱ्याला विचारणा केली जाते. अधिकारी दोषी आहे असे दिसून आल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाते. Compliant direct to PM Modi
या कार्य प्रणाली मुळे कोणता फायदा होईल?

नागरिकांच्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालया पर्यंत पोहोचाव्यात यासाठी https://www.pmindia.gov.in/en पोर्टल सुरु करण्यात आले. याचा उद्देश एवढाच होता की, भारताच्या तळा-गाळातील प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक समस्या सोडवण्यात याव्यात. शासकीय कार्यालया तील अधिकारी बाबूंकडून एखादे काम करताना दिरंगाई होत असेल तर त्यावर तोडगा काढता यावा. मग याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे का? हे तपासण्याची खरं तर गरज आहे. चला तर मग तुमच्या कंम्प्युटर किंवा मोबाईलच्या माध्यमा तून तुमच्या परिसरातील एखादी तक्रार करा पंतप्रधान कार्यालयाला आणि पडताळून पहा या योजनेचा तुम्हाला काही उपयोग होतो आहे की, नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून 45 दिवसांच्या आत प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. Compliant direct to PM Modi