CIBIL SCORE: असा वाढवा CIBIL Score… CIBIL Score वाढवविण्याचा सर्वात सोपा मार्ग…!

CIBIL SCORE
CIBIL SCORE

CIBIL SCORE: मित्रांनो, कधी ना कधी अचानक आपल्याला पैशांची गरज भासत असतेच, यासाठी चांगले आर्थिक नियोजन आणि योजना आखाव्या लागतात. मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल परंतु तुमच्या कडे कोणते ही भांडवल नसेल, आणि आता तुम्ही त्या साठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर मित्रांनो, हे कर्ज घेण्या साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर (CIBIL SCORE) चांगला असणं फार आवश्यक असणार आहे.

जर तुमचा क्रेडिट-स्कोअर चांगला असेल तर तुम्ही कमी वेळेत झट-पट कर्ज मिळवू शकता. या साठी तुम्ही वेळो-वेळी तुमच्या क्रेडिट स्कोअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही या कडे विशेष लक्ष द्या जेणे करून तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल. CIBIL SCORE

क्रेडिट स्कोअरचा फायदा कसा होतो? CIBIL SCORE

जेव्हा तुम्हाला कोणत्या ही प्रकार च्या कर्जा साठी अर्ज करायचा असतो, तेव्हा बँक प्रथम तुमचा क्रेडिट-स्कोअर तपासते आणि नंतर तुम्हाला कर्ज देते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 300 ते 900 पॉइंट्सच्या दरम्यान असेल तर बँक तुम्हाला लवकर कर्ज देईल. एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती त्याच्या क्रेडिट स्कोअर वरून ठरवता येते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि व्याज-दरही कमी असेल.

क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा | How to increase CIBIL SCORE?

मित्रांनो, तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरावे लागतील आणि इतर बिलेही वेळेवर भरावी लागतील, क्रेडिट कार्डचा हप्ता देखील वेळेवर भरायला लागेल. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाचे हप्ते वेळेवर परत करा. अन्यथा तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होईल.

तुम्ही तुमचे हप्ते वेळेवर भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर वाढेल. बरेच लोक वैयक्तिक कर्ज घेतात जे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येतात. तुम्ही वारंवार कर्ज घेत असाल तर त्याचा तुमच्या सिबील स्कोअर वर उलट परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी तुम्ही जर गृहकर्ज, कार लोन इत्यादी कर्ज घेतले तर तुमच्या सिबिल स्कोअर ची स्थिती चांगली असू शकते, कारण वाहन घेण्यासाठी असणारे कर्ज आणि गृह कर्ज हे सुरक्षित श्रेणीत येतात.

कर्ज घेण्यासाठी CIBIL Score का महत्वाचा आहे? | CIBIL SCORE Importance

TransUnion CIBIL ही RBI अधिकृत क्रेडिट एजन्सी आहे जी वित्तीय संस्थांकडून डेटा घेऊन क्रेडिट स्कोअर आणि व्यक्ती किंवा व्यवसायांसाठी त्यांचा क्रेडिट अहवाल तयार करते. हा अहवाल, क्रेडिट कार्डचा अर्ज किंवा कर्जासाठीचा अर्ज मंजूर करण्यात किंवा नाकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या बाबतीतील अधिक सविस्तर माहिती आम्ही पुढे दिलीच आहे.

बँक/NBFC सारख्या वित्तीय संस्थाद्वारे ग्राहक आणि व्यवसाय च्या क्रेडिट डेटासह ग्राहक माहिती ट्रान्सयुनियन CIBIL ला सबमिट केली जाते. या माहितीमध्ये अर्जदाराचे मागील क्रेडिट वर्तन, थकित कर्जाची रक्कम, पेमेंट इतिहास, अलीकडील कर्ज किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स, कॉलेटरल किंवा सुरक्षा (लागू असल्यास, 30-45 दिवस) इत्यादींचा समावेश केला जातो.

CIBIL क्रेडिट संस्थांकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे त्याचे अल्गोरिदम वापरून CIBIL स्कोर (300-900) असलेल्या व्यक्तींसाठी क्रेडिट माहिती अहवाल (CIR) तयार करण्यात येतो. त्यासोबतच CIBIL रँक (1-10) सह व्यवसायांसाठी कॉर्पोरेट क्रेडिट रिपोर्ट (CCR) देखील जारी केले जातात.

या CIBIL अहवालातील CIBIL रेटिंगच्या आधारे, कर्ज देणाऱ्या संस्था व्यवसायाच्या जोखमीच्या क्षमतेचे मूल्यांकन करतात आणि त्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही याचा निर्णय यावरून घेण्यात येतो.

CIBIL स्कोअर चांगला असलेल्या अर्जदारांना कमी व्याजदराने कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता ही इतरांच्या तुलनेत अधिक असते. त्याच वेळी, ज्या लोकांनी नुकताच क्रेडिट कार्ड साठी अर्ज केला आहे, किंवा त्यांची कोणतीही क्रेडिट हिस्टरी (NA)/(NH) नाही, तर त्यांना कमी सिबिल स्कोअर मुळे क्रेडिट कार्ड मिळणे कठीण असते. CIBIL SCORECategories

Sharing Is Caring:

Leave a Comment