Ahilya Sheli Yojana 2024 : शेळी पालना साठी शासन देत आहे इतके टक्के अनुदान; अधिक माहिती जाणून घ्या…

Ahilya Sheli Yojana 2024
Ahilya Sheli Yojana 2024

महाराष्ट्र राज्यात आज देखील आपले शेतकरी बांधव पारंपरिक पद्धतीनेच शेती करत आहेत. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाच्या लहरी पणा मुळे शेती मधून कधी उत्पादन चांगले मिळते तर कधी कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर  उत्पादन कमी मिळते.  त्यामुळेच ग्रामिण भागा तील शेतकऱ्यांना उत्पादनाच्या दृष्टीने आणखी एक स्त्रोत निर्माण व्हावा या साठी शासन शेळी पालना करीता अनुदान देत आहे. या योजने ला अहिल्या  शेळी पालन योजना असे नाव देण्यात आले आहे. चला तर मग या योजने बद्दल अधिक माहिती मिळवू. Ahilya Sheli Yojana 2024

अहिल्या शेळी योजने विषयी अधिक माहिती

महाराष्ट्र राज्यातील ग्रामिण भागामध्ये शेती बरोबरच शेळी पालन व्यवसाया ला चालना देण्या साठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्या साठी पशुधन अभियान अंतर्गत अहिल्या शेळी पालन योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना  90 टक्के अनुदानावर 10 शेळ्या आणि 1 बोकड हे दिले जाते. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी व पशु-पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासन ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी या योजनेचा प्रचार करीत आहे. Ahilya Sheli Yojana 2024

अहिल्या शेळी योजनेची वैशिष्ट्ये.

  • अहिल्या शेळी पालन योजनेअंतर्गत उस्मानाबादी किंवा संगमनेरी शिवा स्थानिक वातावरणातील प्रजातींचे  एक बोकड असा 10 शेळ्यांचा  गट वाटप करण्यात येईल.
  • शासकीय अनुदानापैकी राज्य शासनाकडून 30 टक्के आणि केंद्र शासनाकडून 60 टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे. दोन्ही मिळून लाभार्थ्याला 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. केवळ 10 टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याला करायचा आहे,

शेळी पालनातील विम्याचा खर्च 4200/- रुपये आणि इतर खर्चासाठी  5800/- खर्च ग्राह्य धरून याच्यासाठी लाभार्थ्याला 90% पर्यंत अनुदान या योजनेमार्फत दिलें जाते Ahilya Sheli Yojana 2024

अहिल्या शेळी योजनेसाठी  पुढील अर्जदार लाभार्थी होऊ शकतात

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी असावा म्हणजेच त्याची जमीन 1 ते 2 एकर पेक्षा जास्त नसावी.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असू नये आणि 60 वर्षापेक्षा जास्त असू नये.
  • अहिल्या शेळी पालन योजनेसाठी महिलांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज करावा,
  •  या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने मागील 3 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • एका घरातील केवळ एकच महिला या योजनेसाठी पात्र राहील.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या घरातील कोणताही व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा
  • ज्या महिला दारिद्र्यरेषेच्या प्रवर्गातील असेल किंवा अनुसूचित समाजाची जमाती प्रवर्गातील असेल अशा लाभ महिलांना लाभ देण्यात येईल

शेळीपालन अनुदान यादी

खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही शेळीपालन योजनेतील अनुदान यादी पाहू शकता.

https://ahd.maharashtra.gov.in/en/sgr-stall

अहिल्या शेळी पालन योजना ही केंद्र व राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेला लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपालिकांमध्ये या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहोचवली जात आहे.

दरवर्षी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना जोड धंदा करता यावा यासाठी नवनवीन योजनांची घोषणा करीत आहे. तुम्हाला या शासकीय योजनांची माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या व्ह्ट्सॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हा किंवा आमच्या बेवसाईटला भेट द्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment