land records 1880: 1880 पासूनचे सातबारे आता मोबाईलवर, घरबसल्या तुमची जमीन ऑनलाईन पहा!

land records 1880: मित्रांनो, जमाना डिजिटल होत आहे आणि आता तुम्हाला तुमच्या जमिनीचे कागदपत्रं मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारायची गरज उरलेली नाही. महाराष्ट्र शासनाने जमीन अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 1880 पासूनचे सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि खाते उतारे आता मोबाईलवर सहज पाहता येणार आहेत.

हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हा डिजिटल बदल तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. आता तुमच्या गावच्या जमिनीची मालकी पाहायची असेल, जुनी कागदपत्रं हवी असतील, किंवा व्यवहार करण्याआधी नोंदी तपासायच्या असतील, सगळं काही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच करता येईल. चला तर मग, या सेवेचा लाभ कसा घ्यायचा, हे या लेखातून समजून घेऊया.

जमिनीच्या डिजिटल कागदपत्रांची गरज का?

पूर्वी जर कुणाला सातबारा उतारा किंवा जमीन संबंधी नोंदी मिळवायच्या असतील, तर त्यासाठी तहसील किंवा तलाठी कार्यालयात जावे लागायचे. तिथे तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे, अनेकदा पुन्हा पुन्हा कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या. काही वेळा तर सरकारी कर्मचारी नीट माहितीही देत नसत. अशा परिस्थितीत ही नवीन “Online Land Record” सेवा म्हणजे सर्वसामान्यांसाठी मोठी सोय ठरणार आहे.

डिजिटल सातबारा सेवा कशी वापरायची?

जर तुम्हालाही तुमच्या जमिनीच्या नोंदी पहायच्या असतील, तर तुम्हाला सगळ्यात आधी “Mahabhulekh” या अधिकृत वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर जावे लागेल.

या वेबसाइट वर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला महाभूमी पोर्टलवर जाऊन आपले भूलेख या विभागात नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल:

  • तुमचं पूर्ण नाव
  • मोबाईल क्रमांक (जो OTP साठी लागेल)
  • ई-मेल आयडी
  • जन्मतारीख
  • तुमचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड
  • तालुका आणि जिल्हा निवडा

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला User ID आणि Password मिळेल. याचा उपयोग करून तुम्ही भविष्यात सहज लॉगिन करू शकता आणि तुमच्या जमिनीशी संबंधित नोंदी अगदी घरबसल्या पाहू शकता.

तुमच्या जमिनीचे कागदपत्र कसे शोधाल?

जेव्हा तुम्ही पोर्टलवर लॉगिन कराल, तेव्हा तुम्हाला “Regular Search” असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल:

  • तालुका आणि जिल्हा
  • गावाचं नाव
  • जमिनीचा सर्व्हे नंबर
  • दस्तऐवजाचा प्रकार (सातबारा, खाते उतारा, फेरफार नोंद इ.)

ही माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण जमिनीचा इतिहास येईल. तुम्ही हे कागदपत्रं पाहू शकता, डाऊनलोड करू शकता आणि गरज असल्यास प्रिंटही काढू शकता.

ही डिजिटल सेवा का फायदेशीर आहे?

या सेवेमुळे सामान्य नागरिकांसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. चला तर मग आता आपण, याचे फायदे काय आहेत ते पाहूया:

  • वेळेची बचत: तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, तुमची सर्व कागदपत्र आणि तुम्हाला आवश्यक असणारी माहिती सहज मोबाईलवर मिळवता येईल.
  • अधिक पारदर्शकता: सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने कोणीही चुकीची माहिती देऊ शकणार नाही.
  • सहज उपलब्धता: तुम्ही कुठूनही आणि कधीही तुमच्या जमिनीची माहिती पाहू शकता.
  • कागदपत्रं सुरक्षित राहतील: डिजिटल स्वरूपात असल्याने ते हरवण्याची किंवा खराब होण्याची भीती नाही.
  • खर्चात बचत: वारंवार तहसील किंवा तलाठी कार्यालयात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज उरली नाही.

भविष्यातील फायदे

या डिजिटल सुविधेमुळे भविष्यात जमीन व्यवहार अजून पारदर्शक होतील. Online Land Record सुविधा सुरू झाल्यामुळे पुढील काही फायदे नक्कीच होतील:

  • जमीन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचं प्रमाण कमी होईल.
  • भ्रष्टाचाराला आळा बसेल.
  • नागरिकांचा वेळ वाचेल आणि श्रम कमी होतील.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती मिळवणं सोपं होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा!

  • User ID आणि Password कोणालाही सांगू नका.
  • मोबाईलवर लॉगिन करताना सार्वजनिक नेटवर्क वापरणे टाळा.
  • नियमितपणे पासवर्ड बदलत राहा.
  • काही अडचण आल्यास अधिकृत हेल्पलाईनशी संपर्क साधा.

मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने “Online Land Record” सेवा सुरू करून एक मोठं पाऊल उचललं आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. तुम्हाला तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्र हवे असतील, तर महाभूमी पोर्टलचा वापर करा आणि, तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment