Farmer ID : शेतकरी ओळखपत्राचे ID क्रमांक येण्यास सुरवात, असा चेक करा तुमचा नंबर, जाणून घ्या सविस्तर…

Farmer ID Apply Online : ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘फार्मर आयडी नंबर’चा मेसेज मिळण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला अद्याप हा संदेश मिळाला नसेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल, तर पुढील स्टेप फॉलो करा

शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नवीन ओळख प्रणाली लागू करण्यात आली आहे. ‘फार्मर आयडी’ हा क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ नावाच्या योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा मागील नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डप्रमाणेच एक वेगळा ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी ओळख क्रमांकाचे उद्दिष्ट काय?

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते तपशील आणि शेतीसंबंधित सर्व महत्त्वाची माहिती एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असून, कोणत्याही मध्यस्थाशिवाय मदत मिळण्यास सुलभता येणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करावे लागणार आहेत.

फायदा काय?

शासकीय योजनांचा लाभ सहजरित्या मिळणार
दलालांची भूमिका कमी होणार
केवायसी (KYC) वारंवार करावी लागणार नाही
पीएम किसान योजनेची पडताळणी अधिक सुलभ होणार.

फार्मर आयडी अर्जाचे स्टेटस कसे तपासावे?

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘फार्मर आयडी नंबर’चा मेसेज मिळण्यास सुरुवात झाली आहे.
जर तुम्हाला अद्याप हा संदेश मिळाला नसेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल, तर पुढील स्टेप फॉलो करा..

सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus या अधिकृत लिंकवर जा.

त्यानंतर, स्क्रीनवर Enrollment ID आणि Aadhaar No हे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला माहिती असलेला पर्याय निवडून त्याच्या समोरील रेडिओ बटणावर क्लिक करा.

निवडलेल्या पर्यायाच्या आधारावर चौकोनात तुमचा क्रमांक प्रविष्ट करा. “Check” बटणावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल.

अर्ज अद्याप मंजूर न झाल्यास “Pending” असा संदेश दिसेल, तर अर्ज मंजूर झाल्यास 11 अंकी ‘सेंटरल आयडी’ क्रमांकासोबत “Approved” स्टेटस दिसेल.

शेतकऱ्यांना योजनांचा जलद आणि सोपा लाभ मिळावा यासाठी ही नवीन प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment