
Bank Of Maharashtra Farm House Loan : तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला तुमच्या शेतावर फार्म हाऊस बांधण्याची इच्छा असेल परंतु आर्थिक अडचणी मुळे तुम्हाला फार्म हाऊस बांधता येत नसेल तर ही माहिती तुमच्या साठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते. कारण बँक ऑफ महाराष्ट्र ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेता वर फार्म हाऊस बांधण्या साठी कृषी टर्म लोन देत आहे. या योजने अंतर्गत तुम्ही मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून फार्म हाऊस बांधू शकणार आहात आणि त्याचा तुमच्या शेती साठी वापर करु शकणार आहात. चला तर मग याबाबत अधिक माहिती मिळवूया!
कर्ज मिळविण्या साठी आवश्यक पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्रा कडून फार्म हाऊस बांधण्या साठी कृषी टर्म लोन योजने साठी अर्ज करताना अर्जदाराची पात्रता देखील तपासण्यात येणार आहेत. बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर दिलेल्या माहिती नुसार,
- अर्जदारा कडे किमान अडीच एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- एक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट या योजने अंतर्गत कर्ज मिळवू शकतील.
- अर्जदार शेतकऱ्याचे वय किमान 18 ते कमाल 65 वर्षे वयोगटा तील शेतकरी या योजने अंतर्गत कर्ज करु शकतील.
- म्हणजेच 18 वर्षा पेक्षा कमी आणि 65 वर्षां पेक्षा अधिक वय असलेले शेतकरी या योजने अंतर्गत कर्ज देण्यास अपात्र ठरणार आहेत.
कर्जाची रक्कम किती असेल?
- 2 लाख रुपये ते 10 लाख रुपयां पर्यंत कर्ज – ज्या शेतकऱ्यांची जमीन 2.5 एकर एवढी जमीन सिंचना खाली असेल त्यांना 2 ते 10 लाख रुपयां पर्यंत कृषी टर्म लोन या बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कर्ज मिळविता येईल.
- 10 ते 50 लाख रुपयां पर्यंत कर्ज – ज्या शेतकऱ्यांची 5 एकर पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त जमीन सिचना खाली किंवा उत्पन्न देय आहे अशांना 10 ते 50 लाखा पर्यंतचे कर्ज मिळवता येईल. Bank Of Maharashtra Farm House Loan
कर्जाचा व्याजदर किती असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना शेतीच्या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्या साठी देत असलेल्या कृषी टर्म योजने अतंर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमे वर व्याज किती असेल असा अनेकांना प्रश्न पडतो. बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकृत संकेत स्थळा वरून उपलब्ध झालेल्या माहिती नुसार, शेती विषयक कर्जा साठी बँक जेवढे व्याजदर आकारते तेवढेच व्याजदर या योजने अंतर्गत शेतकऱ्यां कडून आकारण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त प्रक्रिया शुल्क देखील आकारण्यात येणार नसल्याचे बँकेच्या नोटिफिकेशन्स मध्ये लिहिण्यात आले आहे. Bank Of Maharashtra Farm House Loan
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा जाणून घ्या!
शेतीत फार्म हाऊस बांधण्या साठी तुम्हाला कर्ज मिळवायचे असल्यास तुम्ही तुमच्या परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या तुमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन तुम्ही याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता. बँकेच्या शाखेतच तुम्हाला या कर्जासाठी लागणारा अर्ज मिळेल.
https://bankofmaharashtra.in/mar/farmhouse-agriculturists-scheme या लिंकवर तुम्हाला योजने संबंधीत सर्व माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑन-लाईन अर्ज करा या बटणा वर क्लिक करुन तुम्ही ऑन-लाईन पद्धतीने अर्ज करु शकता. Bank Of Maharashtra
शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कसा होईल?
बँक ऑफ महाराष्ट्रने शेतकऱ्यां साठी सुरु केलेल्या कृषी टर्म लोन मुख्यत्वे ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर फार्म हाऊस बांधण्या साठी आर्थिक मदत देण्यासाठी आहे. त्याचा शेतकऱ्यांना कोण-कोणत्या प्रकारे फायदा होणार आहे ते आपण पुढील मुद्द्यांच्या मदतीने समजूव घेऊ.
- शेतकऱ्यांना शेतातील पिक किंवा धान्याची साठवणूक करण्यासाठी फार्म हाऊसचा उपयोग होऊ शकतो.
- शेतीची अवजारे ठेवण्यासाठी फार्म हाऊसचा उपयोग होऊ शकतो.
- अनेक बाजारपेठांमधील एजंट शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेतात आणि त्याची साठवणूक करुन जास्त दराने विकतात. अशावेळी शेतकऱ्यांकडे धान्याची साठवणूक करण्यासाठी योग्य जागा नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु फार्म हाऊस असेल तर शेतकऱ्यांना स्वतःचे धान्य योग्य पद्धतीने साठवणूक करु शकतील आणि योग्य बाजारात धान्याचा योग्य दर मिळाल्यानंतर ते विकू शकतील. यात शेतकऱ्यांचाच फायदा आहे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर किंवा संबंधीत वाहने वापरावी लागतात ती फार्म हाऊसच्या ठिकाणी ठेवता येतील.
या सर्व गोष्टी पाहता आपल्या लक्षात येते की शेतकऱ्यांना फार्म हाऊसची आवश्यकता असते. परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना फार्म हाऊस बनवता येत नाही. आणि म्हणूनच बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी कृषी टर्म लोन ही योजना जाहीर केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. Bank Of Maharashtra Farm House Loan