How to Check CIBIL Score | असा चेक करा मोफत सिबिल स्कोअर

How to Check CIBIL Score
How to Check CIBIL Score

How to Check CIBIL Score: सध्याच्या काळात महागाई ही चांगलीच वाढलेली आहे. आपला महिन्या च्या पगाराचा खर्च खाण्या-पिण्यावर होऊन जातो. यामुळेच सामान्य माणूस हा आपल्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्या साठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा नक्कीच विचार करत असतो. पण तुमचे वैयक्तिक कर्ज हे तुम्हाला सिबिल स्कोअर वर अवलंबून असते. तुमचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर तुमचे कर्ज लगेच मंजूर होते. तसेच चांगल्या CIBIL स्कोअर सह तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मिळू शकते. सिबिल स्कोअर खराब असल्यास तुम्हाला कर्ज मिळवण्यास अडचणी येऊ शकतात.

सिबिल स्कोअर हा साधारणपणे 300 ते 900 अंका च्या दरम्यान असतो. जर तुमचा सिबिल स्कोअर हा 750 किंवा त्या पेक्षा जास्त जर असेल तर बॅंक तुम्हाला सहज आणि जलद गतीने कर्ज देते. जितका तुमचा CIBIL Score चांगला तितक्या लवकर तुम्हाला बॅंक कर्ज देते. जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल तर बॅंक कर्ज देण्यास टाळा-टाळ करते. कर्ज मंजूर झाले तरी त्या कर्जाचे व्याजदर है जास्त असते. (how to check cibil score in marathi)

cibil score check free बँका कोणत्याही कर्ज देण्या-पूर्वी आधी त्या व्यक्तीचा CIBIL Score नक्कीच चेक करतात. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोअर चांगला असतो त्याचे कर्ज लवकर मंजूर होते आणि कमी व्याजदर आकारले जाते. तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा किंवा यापेक्षा जास्त असेल तर चांगला मानला जातो. मात्र या पेक्षा कमी सिबिल स्कोअर यापेक्षा कमी असेल तर कर्जा साठी जास्त व्याज दर आकारले जाते. (cibil score check free by pan number)

सिबिल स्कोअर तुम्ही कर्जा ची वेळे-वर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून असतो. 25 टक्के सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर, 25 टक्के क्रेडिट एक्सपोजरवर आणि 20 टक्के कर्जाच्या वापरावर अवलंबून असते. cibil score check online तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही त्याचे बिल वेळेवर भरले नाही तर तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होतो. यामुळे तुम्ही तुमचे कर्जाचे सर्व व्यवहार क्लिअर ठेवत जा.

CIBIL स्कोर 24 महिन्यांच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारे तयार केला जातो. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी CIBIL स्कोअरचा रेकॉर्ड ठेवते. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होईल किंवा खाली येईल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही त्याचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट कार्डवर परिणाम होतो. यामुळे सिबिल स्कोर मेंटेन ठेवणे आवश्यक आहे.


How to Check CIBIL Score in Mobile सिबिल स्कोअर मोबाईलवर कसा चेक करायचा?

1) मोफत सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी सर्वप्रथम  खालील वेबसाईटवर जा.

https://www.cibil.com/freecibilscore 
2) आता वेबसाईटवर आल्यानंतर, Get Your Free CIBIL Score वर क्लिक करा.
3) आता तुम्हाला येथे काही माहिती विचारल्या जाईल. आपले नाव, ई मेल आय.डी. आणि पासवर्ड तयार करा.
4) यानंतर, तुम्हाला तुमचा कोणताही आय.डी. पुरावा द्यावा लागेल. ज्या मध्ये पासपोर्ट क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड किंवा मतदार ओळख-पत्र क्रमांक यापैकी एखादा क्रमांक निवडा.
5) त्यानंतर, तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाका.

6) सर्व माहिती टाकल्यानंतर, Accept आणि Continue पर्यायावर क्लिक करा.
7) आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल. आलेला ओटीपी एंटर करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.
8) आता तुम्हाला ‘तुमची नोंदणी यशस्वी झाली’ असा मॅसेज मिळेल. त्यानंतर वेबसाइटच्या डॅश बोर्डवर जा. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला दिसून जाईल.
9) credit score check free online अशाप्रकारे तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर मोफत तपासू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment