BSNL SIM CARD ONLINE: घर बसल्या मिळवा BSNL 4G/5G सिम-कार्ड. ऑर्डर करताच फक्त 90 मिनिटात होईल डिलिव्हरी

BSNL SIM CARD ONLINE
BSNL SIM CARD ONLINE

BSNL SIM CARD ONLINE भारतामधील प्रमुख खाजगी टेलिकॉम नेटवर्क असलेल्या एअरटेल, जिओ आणि व्ही.आय. या कंपन्यां नी आपापल्या रिचार्ज दरां मध्ये वाढ केल्या नंतर लोकांनी आपला कल सरकारी दूर-संचार कंपनी असलेल्या BSNL कडे मोठ्या प्रमाणात वळवला आहे. BSNL या कंपनीने जुलै महिन्यात आंध्र प्रदेशात २,१७,००० नवीन कनेक्शन आपल्या नेट-वर्क वर जोडले आहेत.

ग्राहकांची BSNL नेटवर्कला मागणी

BSNL कंपनी संपूर्ण देशात आपल्या 4G सेवे चा विस्तार करत असतानाच भारता तील काही महत्वाच्या शहरां मध्ये 5G नेटवर्क टेस्टिंग करून लवकरच ह्या शहरां मध्ये 5G सुरू करण्या-साठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ऑक्टोबर अखेर पर्यंत सरकारचे 80,000 तर मार्च 2025 पर्यंत 21,000 टॉवर उभारले जाणार आहेत. तसेच 5G सेवां साठी सध्या वापरात असलेल्या 4G कोरवर 5G वापरणे शक्य आहे व त्यासाठी टॉवर मध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू असल्याचे देखील मंत्री महोदयांनी सांगितले. BSNL SIM CARD ONLINE

BSNL चे सिम मिळविण्यास अडचणी

जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आणि ग्राहकांनी बाजूला सारलेला पर्यार उत्तम सुविधां सह धावून आला आणि तो पर्याय म्हणजेच BSNL. इतर कंपन्यांच्या अनेक ग्राहकांनी त्यांचे मोबाईल नंबर BSNL नेटवर्क मध्ये पोर्ट करुन घेतले आहे. त्यामुळे या कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत लाखोंच्या संख्येने वाढ झाली. बी.एस.एन.एल.च्या अशा जलद वाटचाली मुळे अनेक नविन ग्राहकांना बी.एस.एन.एल.चे सिम कार्ड मिळविणे कठीण जात आहे. परंतु जर ग्राहकांना सिम कार्ड जलद गतीने मिळवायचे असेल तर बीएसएनएल सिम कार्ड ऑनलाईन ऑर्डर करून घरबसल्या ते जलद गतीने मिळवु शकतात. ऑनलाईन सिम कार्ड मिळवण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे-

BSNL सिम कार्ड ऑर्डर करण्याची प्रक्रिया-

  • सर्वप्रथम ग्राहकांनी या http://prune.co.in/  संकेतस्थळाला भेट दयावी.
  • “Buy sim card” वर क्लिक करा. आणि देश म्हणून भारताची निवड करावी
  • तुमचा ऑपरेटर म्हणून BSNL निवडा आणि तुमची FRC योजना निवडा.
  • सर्व आवश्यक प्राथमिक माहिती व ओटीपी भरा.
  • तुमचा पत्ता आणि स्क्रिन वरील सुचनांचे पालन करा.

ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढील ९० मिनिटांत तुमचे सिम कार्ड तुमच्या घरी मिळेल व त्याचबरोबर केवायसी करुन त्वरीत तुमचे सिम कार्ड सक्रिय केले जाईल. ही सुविधा सदया देशातील हरिय़ाणा, उत्तर प्रदेश या राज्यात उपलब्ध आहे. आणि लवकरच ही सुविधा देशभरातील सर्व नागरिकांपर्यत पोहचेल असे बीएसएनएल च्या वतीने सांगण्यात आले आहे. देशातील बाकींच्या राज्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी थोडीशी प्रतिक्षा करावी लागेल. BSNL SIM CARD ONLINE

BSNL ने 15 हजार पेक्षा जास्त 4G टॉवर्स बसवले

ग्राहकांना कमी खर्चात सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी  भारत संचार निगम कंपनी संपुर्ण भारतात 4G टॉवर्स बसवत आहे. आतापर्यंत BSNL ने भारतातील विविध राज्यांमध्ये  15 हजारापेक्षाही जास्त  मोबाईल साइट्सवर 4G नेटवर्कसहित  स्थापित केले आहेत. BSNL ने आपल्या त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे ही माहिती ग्राहकांना दिली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत त्यांनी देशात 15000 नवीन 4G साइट्स तयार केल्या आहेत.

एवढेच नाही तर, कंपनीने आता देशात 5G म्हणजेच BSNL 5G सेवेची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. BSNL कंपनी सध्या टाटा कंपनीच्या सहाय्याने अपग्रेड होऊन खाजगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी भारतीयांनी देखील शासकीय कंपनी असलेल्या BSNL च्याच सुविधा वापराव्या आणि या खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या मनमानी कारभाराला टाळे लावावे. BSNL SIM CARD ONLINE

Sharing Is Caring:

Leave a Comment