Ladaki bahin yojana update:

Ladaki bahin yojana update
Ladaki bahin yojana update

Ladaki bahin yojana update 2024 अर्थ-संकल्पिय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली.  या योजने अंतर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्या नुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात देखील झालेली आहे. त्या नंतर अर्ज करण्याच्या अनेक त्रुटी दूर करून नव्या बदलां सह या योजनेचे निकष पुन्हा जाहीर करण्यात आले आहे.

राज्य सरकारने योजने ची घोषणा झाल्या पासूनच याचा लाभ घेण्या साठी पात्र महिलांनी अर्ज केले होते. आणि उर्वरित असलेल्या महिला अर्ज करत आहेत. या योजनेला राज्य भरातून मोठा प्रतिसाद ही मिळाला आहे. जवळ पास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजने साठी आपले नाव नोंदविले आहे. या सर्व महिलांना येत्या १४ तारखेला च ही रक्कम मिळणार असल्याचे सांगितले आहे. Ladaki bahin yojana update

न्यायालयात योजने विरोधात याचिका सादर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने, योजनेचा पहिला हप्ता थांबवून ठेवण्यात आला होता. कारण याचिके मध्ये 14 ऑगस्ट 2024 ला वितरीत करण्यात येणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा पहिला हप्ता थांबवण्या ची मागणी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात  या याचिके वर तातडीची सुनावणी झाली. या सुनावणी दरम्याने सरकारी धोरणात हस्त-क्षेप करण्यास न्यायालया ने नकार दिला आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय असून त्याला आव्हान अशा पद्धतीने आव्हान करता येणार नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालया ने याचिका-कर्त्यांच्या याचिके वर सुनावणी करताना जाहीर केला.

विधानसभा डोळ्यासमोर ठेवून योजना जाहिर

लाडकी बहीण योजने विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करणाऱ्यांनी असे मत मांडले आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणूकांना डोळ्यांसमोर ठेवून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. इतकेच नाही तर  या अशा पद्धतीच्या योजनांसाठी सामान्य जनतेच्या करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे. निवडणूक आयोगाच्या कडक नियामांमुळे नागरिकांना पैसे वाटता येणार नाही परंतु अशा पद्धतीच्या योजना जाहीर करुन पुन्हा सत्तेवर येण्याची ही एक तरतूद असल्याचे देखील अनेक अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. अशी आमिषे दाखवून मतदार वळण्याचा प्रकार आहे.  राज्य सरकारचा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या योजनेवर बंदी आणावी असे याचिका कर्त्याचे म्हणणे होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ही योचिका फेटाळून लावली आहे आणि आता रक्षाबनंध सणाच्या आधीच 14 ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार आहेत. Ladaki bahin yojana update

31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

तुम्ही अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर काळजी करु नका तुम्ही सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र किंवा नारीशक्ती ऍपच्या मदतीने या योजनेसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. तसेच अर्जाच्या छाननीची अंतिम तारीख देखील 31 ऑगस्टचं ठरविण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल दीड कोटी महिलांनी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे. शासनाला मिळालेल्या अर्जांच्या छाननीतून केवळ 50 हजार महिला लाभार्थी पात्र ठरविण्यात आले आहेत. कारण काही अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यात आली नव्हती असे छाननी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. Ladaki bahin yojana update

महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात जाणारा योजनेचा पहिलाच हप्ता थांबविण्यात आला होता. परंतु न्यायालयानेच या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे म्हटल्यावर लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment