Maharashtra Voter List 2024: महाराष्ट्र मतदार यादी 2024, ऑन-लाईन पद्धतीने तुमचे नाव शोधा

Maharashtra Voter List 2024
Maharashtra Voter List 2024

Maharashtra Voter List 2024 आपल्या भारतात लोकशाही पद्धतीने ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या पातळ्यांवर निवडणूकांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडले जातात. लोकांनी लोकां साठी चालवलेले शासन येथे मान्य करण्यात आले आहे. त्यालाच आपण लोकशाही असे म्हणतो. या लोकशाही कार्य-पद्धतीत नागरिकांना सर्वात महत्वाचा म्हणजेच मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा मतदानाचा अधिकार बजावण्या साठी नागरिकांचे मतदार यादीत नाव असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्या शिवाय नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार मुळीच बजावता येत नाही. Maharashtra Voter List 2024

सध्या डिजिटलच्या माध्यमा तून आपळे मतदार यादीत नाव नोंदवणे किंवा मतदार यादीत आपले नाव तपासणे या सर्व गोष्टी ऑन-लाईन करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ तर वाचतो आणि मतदार नोंदणी ची कामे देखील वेगाने होऊ शकतात. निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 2024 मधील मतदार यादी जाहिर केली आहे. या यादीत तुमचे नाव तपासण्या ची संपूर्ण ऑन-लाईन पद्धती आपण सविस्तर या लेखाच्या माध्यमा तून पाहणार आहोत. लेख संपुर्ण वाचा आणि नव्याने मतदार नोंदणी केलेल्या तुमच्या नातेवाईकांना देखील हा लेख पाठवा जेणे करुन त्यांना देखील मतदार यादी तील नाव शोधण्यास नक्कीव मदत होईल. Maharashtra Voter List 2024

महाराष्ट्र राज्याची अंतीम मतदार यादी 2024

राज्याची अंतीम मतदार यादी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात 9 कोटी 12 लाख 43 हजार 10 मतदार येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत मतदानास पात्र ठरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत 18 ते 29 या वयोगटातील मतदारांची संख्या 14,03,798 ने वाढून आता 1 कोटी 73 लाख 63 हजार 835 इतकी झाली आहे. यावरून असे लक्षात येते की, यावर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांमध्ये तरुण मतदार जास्त मतदान करणार आहेत. Maharashtra Voter List 2024

महाराष्ट्र मतदार यादीत नाव शोधण्याची प्रक्रिया -Search your name in Voter List

  • मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • तुम्ही https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या लिंकवर क्लिक करुन देखील मुख्य निवडणू
  • क अधिकारी, महाराष्ट्र राज्य वेबसाईटला भेट देऊ शकता.
  • मुख्यपृष्ठावर, तुम्हाला Voter name search हा पर्याय दिलेस त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला नावानुसार किंवा ओळखपत्रानुसार तुमचे मतदार पत्रक शोधण्याचा पर्याय दिसेल.
  • समोर विचारण्यात आलेल्या माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही राहत असलेली विधानसभा, वॉर्ड , बुध अशापद्धतीने तुम्हाला माहिती विचारली जाईल.  ही माहिती भरल्यानंतर सबमिट करताच
  • तुम्ही या आधी मतदार यादीत नाव नोंदणी केलेली असल्यास तुम्हाला तुमचे नाव आणि मतदार क्रमांक दिसेल. तो PDF स्वरुपात सेव करुन ठेवा. जेणेकरुन मतदानाच्या वेळी तुम्ही मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकाल.

बरेचदा मतदार कार्ड येण्यास वेळ लागतो त्यावेळी तुम्ही मतदान करण्यासाठी अशा पद्धतीचे PDF घेऊन जाऊ शकता. Maharashtra Voter List 2024

गुगल ऍप्सच्या मतदार यादी महाराष्ट्र 2024 मदतीने मतदार यादीत नाव शोधणे

सध्या शासकीय सर्व सुविधा आपण मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून मिळताना दिसून येत आहेत. त्यामुळे मदतार यादी देखील डिजिटल स्वरुपात मोबाईल ऍप वर उपलब्ध आहे.

  • तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये “मतदार यादी महाराष्ट्र 2024” हे सर्च करताच पहिल्याच क्रमांकाचे ऍप डाऊनलोड करा.
  • तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगीन करा.
  • त्यामध्ये तुमचे नाव, तुम्ही राहत असलेल्या वॉर्ड क्रमांक, विधानसभा अशी संपूर्ण माहिती भरा
  • काही सेकंदातच तुमचे मतदार कार्ड आणि तुमचे मतदान सेंटर तुमच्यासमोर येईल.

ही माहिती सेव करुन ठेवा. Maharashtra Voter List 2024

Sharing Is Caring:

Leave a Comment