Buy cars at low prices: आपल्यातल्या प्रत्येकाला आपल्या घरासमोर एक सुंदर, स्वतःची अशी कार उभी असावी असं वाटतंच. किंवा रोजच्या प्रवासासाठी एखादी बाईक किंवा स्कुटी तरी आपल्याजवळ असावी, जेणेकरून वेळ वाचेल आणि प्रवास सुद्धा सोपा होईल. पण सध्याच्या गगनाला भिडणाऱ्या वाहनांच्या किमती पाहता हे स्वप्न अनेकांसाठी केवळ स्वप्नच राहतं. पण आता तुमचं हे नक्कीच सत्यात येऊ शकतं, कारण तुम्ही केवळ 15 ते 20 हजारांत बाईक किंवा स्कुटी आणि 1 लाखाच्या आसपास चारचाककार खरेदी करू शकता, तीही ब्रँडेड. कसं शक्य आहे हे सगळं? तर याचं कारण आहे बँकांचे वाहन लिलाव.
बँका गाड्यांचा लिलाव का करतात? | Bank auction for cars
जेव्हा एखादा व्यक्ती वाहन कर्ज घेतो आणि वेळेत त्याचे हप्ते भरू शकत नाही, तेव्हा बँका त्याला एक ठराविक कालावधी देतात. जर त्या वेळेत त्या व्यक्तीने सगळे हप्ते भरले नाहीत, तर बँक ते वाहन जप्त करते. या जप्त केलेल्या गाड्याच नंतर बँका लिलावात काढतात, ज्यातून त्यांना त्या व्यक्तीच्या राहिलेल्या कर्जाची भरपाई मिळवता येते.
या लिलावांमध्येच अनेक उत्तम दर्जाच्या आणि चांगल्या स्थितीतील चारचाकी गाड्या आणि दुचाकी अगदी स्वस्त दरात विकल्या जातात. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या किंमतीत ब्रँडेड गाडी खरेदी करायची असेल, तर बँक लिलाव हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
किती स्वस्तात मिळते गाडी?
जर एखाद्या कारची मूळ बाजारभाव किंमत 10 लाख रुपये असेल, तर बँकेच्या लिलावात तीच कार तुम्हाला 3 लाख किंवा त्याहून कमी दरातही मिळू शकते. बँका काही वेळा फक्त मूळ किमतीच्या 20 ते 30 टक्क्यांत गाड्या (Buy cars at low prices) विकतात. तसंच दुचाकी किंवा स्कुटीच्या बाबतीतही आहे, साधारण 15 ते 20 हजारांत चांगली गाडी खरेदी करता येते.
बँक लिलावात सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं?
बँकांच्या अधिकृत वेबसाईट्सवर लक्ष ठेवा, सरकारी आणि खासगी बँका त्यांच्या लिलावाच्या तारखा, वेळा आणि वाहनांची यादी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करतात. त्यामुळे ही माहिती नियमित तपासणं गरजेचं आहे. तसेच काही वेळा बँका ऑनलाईन मीडियाव्यतिरिक्त वर्तमानपत्रांतही जाहिराती देतात.
यासोबतच हे लक्षात ठेवा की, लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम ‘अनामत’ म्हणून भरावी लागते. ही रक्कम सामान्यतः वाहनाच्या किमतीच्या 10 टक्के इतकी असते. म्हणजे, एखाद्या कारसाठी ही रक्कम 13000 ते 15000 रुपयांदरम्यान असू शकते. तसेच लिलावाच्या दिवशी योग्य ठिकाणी वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे.
लिलाव जिंकल्यानंतर काय करायचं?
तुमची बोली निवडली गेल्यानंतर बँक तुमच्या नावाने एक प्रमाणपत्र जारी करते की, ही गाडी तुम्ही लिलावातून खरेदी केली आहे. आणि ही अधिकृत ओळखपत्र म्हणून वापरली जाते. त्यानंतर त्या गाडीची नोंदणी तुमच्या नावावर केली जाते. तसेच लिलावाच्या ठिकाणीच तुम्हाला त्या वाहनाची सर्व कागदपत्रं मिळवण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते.
कोणती वाहनं लिलावात मिळतात?
या लिलावांमध्ये स्विफ्ट, डिझायर, इंडिका, आय20, इनोव्हा, वॅगनआर, होंडा सिटी, फॉर्च्युनर यासारख्या नामांकित ब्रँड्सच्या कार्ससुद्धा उपलब्ध असतात. याशिवाय बजाज, होंडा, TVS, हिरो यांसारख्या ब्रँड्सच्या बाईक्स व स्कुटी मिळतात.
हे लक्षात ठेवा
- लिलावातील गाड्या काहीशा वापरलेल्या असतात, पण अनेक वेळा त्यांच्या स्थिती ही चांगलीच असते.
- तसं तर सर्व माहिती बँकेकडून दिली जातो, मात्र गाडी प्रत्यक्ष पाहणं योग्य ठरतं.
- बँकेकडून तुम्हाला पूर्ण कागदपत्रं मिळतात, पण तरीही एकदा खात्री करून घ्या.
- लिलावात एकदा पैसे भरले की ते परत मिळत नाहीत, त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या.
आजच्या महागाईच्या काळात एखाद्या गरजू व्यक्तीसाठी स्वस्तात गाडी मिळणं म्हणजे मोठी संधी असते. बँक लिलाव हे अशा संधींपैकीच एक आहे. जर तुम्ही बजेटमध्ये स्वतःची गाडी खरेदी करू इच्छित असाल, तर बँक लिलावाची माहिती ठेवणं, त्यात सहभागी होणं आणि नियम समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
